४५ अधिकारी-अंमलदारांना राष्ट्रपती, अतिउत्कृष्ट, उत्कृष्ट व विशेष सेवा पदक जाहीर
पिंपरी, दि. १६ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील दीर्घकालीन, निष्कलंक आणि गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेत केंद्र व राज्य शासनाकडून विविध सेवा पदकांची घोषणा करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तब्बल ४५ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवा पदक, उत्कृष्ट सेवा पदक तसेच विशेष सेवा पदक जाहीर झाल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
गुणवत्तापूर्ण व प्रदीर्घ सेवा बजावल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्याचबरोबर १४ अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, १५ अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक, तर १५ पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
अतिउत्कृष्ट सेवा पदक….
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सपोआ विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक नितीन गिते, अनिल विभुते, अरविंद पवार, गोरखनाथ कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, सपोफौ नागेश माळी, राजेंद्र शिंदे, सुनील कानगुडे, राजू जाधव, आदिनाथ मिसाळ तसेच पोलीस हवालदार रामदास बारटक्के यांना अतिउत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
उत्कृष्ट सेवा पदक….
पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सुहास आव्हाड, रविकिरण नाळे, सचिन शिर्के, सपोनि सचिन घाटे, सपोफौ दीपक महाजन, राजेंद्र कोनकेरी, पोलीस हवालदार विवेक जगदाळे, अनिल साळुंखे, अमोल निघोट, संतोष शिंदे, आशिष बोटके, कामिनी पवळे तसेच मपोशि नूतन जव्हेरी यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.
विशेष सेवा पदकानेही गौरव…
नक्षलग्रस्त भागात खडतर व उल्लेखनीय सेवा बजावलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कार्याची दखल घेत पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, पोलीस उपनिरीक्षक सागर देवकर, महेश सातपुते, गणेश आटवे, दत्तात्रय सुकाळे, श्रीकांत गुरव, महादेव भालेराव, आबा कटपाळे, प्रकाश पारखे, राहुल दुधमल, लक्ष्मण मोगले, अनिल टार्फे, चंद्रशेखर मोरखंडे, राजेंद्र पानसरे आणि चिरंजीव दलालवाड यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.
शिवनेरी हॉलमध्ये पदक प्रदान समारंभ..
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिवनेरी हॉलमध्ये पदक प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते पदक विजेत्या अधिकारी व अंमलदारांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली, सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसेच पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
दीर्घकालीन, कर्तव्यनिष्ठ आणि गुणवत्तापूर्ण सेवेचा सन्मान म्हणून मिळालेल्या या पदकांमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचा गौरव अधिक उंचावला असून, पदकप्राप्त अधिकारी-अंमलदारांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.