Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ

August 14, 2026

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 14, 2026

दापोडीत गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ
पिंपरी चिंचवड

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

८.३३ टक्के प्रथा बोनस कायम; पाच वर्षांचा करार;महापालिका स्थायी समिती सभेत अध्यक्ष अभिषेक बारणे यांची मंजुरी

पिंपरी, दि. १४ ऑगस्ट : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी अधिक आनंदाची ठरणार आहे. दरवर्षी देण्यात येणाऱ्या 8.33 टक्के प्रथा बोनससोबत सानुग्रह अनुदानात ५ हजार रुपयांची वाढ करून ते २५ हजारांऐवजी ३० हजार रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. तसेच, पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच सन 2025-26 ते 2029-30 या कालावधीसाठी बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचा करार करण्यासही स्थायी समिती सभेचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी मान्यता दिली आहे.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्मचारी महासंघाने दिवाळी प्रथा बोनस व सानुग्रह अनुदानाबाबत पाच वर्षांचा करार करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कामगार कल्याण मंडळाने प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे मांडला. या प्रस्तावावर चर्चा करताना स्थायी समितीने केवळ प्रस्तावाला मंजुरी देण्यापुरते मर्यादित न राहता सानुग्रह अनुदानाची रक्कम २५ हजारांवरून ३० हजार रुपये करण्याची उपसूचना मंजूर केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत त्यांच्या आर्थिक लाभात वाढ करण्याची भूमिका अध्यक्ष बारणे यांनी घेतली. उपसूचनेसह हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला आहे.

सहा हजारांहून अधिक कर्मचा-यांचे ‘कल्याण’

महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच शिक्षण विभाग आणि वैद्यकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासह निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्रथा बोनस व सानुग्रह अनुदानाचा लाभ दिला जातो. पाच वर्षांचा करार झाल्यास दरवर्षी बोनस व अनुदानाबाबतची अनिश्चितता कमी होऊन कर्मचाऱ्यांना आर्थिक नियोजन करता येणार आहे. महापालिकेत सहा हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मागील वर्षी दिवाळी बोनस व संबंधित खर्चासाठी महापालिकेने सुमारे ६२ कोटी रुपये खर्च केले होते. कर्मचा-यांच्या हितासाठी सानुग्रह अनुदानात भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या लाभात कपात नाही

स्थायी समिती सभेचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या भूमिकेमुळे कर्मचारी हिताला प्राधान्य देत बोनसची परंपरा कायम ठेवण्याबरोबरच सानुग्रह अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामाचा आणि योगदानाचा विचार करून त्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. पाच वर्षांचा करार आणि सानुग्रह अनुदानातील वाढ यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या काळात अतिरिक्त आर्थिक आधार मिळणार असून, पुढील काही वर्षांसाठी लाभाची निश्चितता निर्माण होणार आहे.

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

कुरुळीत महिलेचा गळा आवळून खून; जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

August 14, 2026

पिंपरी गावातील क्रीडांगणाची दुरवस्था; १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर साफसफाईची मागणी

August 14, 2026

समाजहिताच्या उपक्रमांतून गणेश मंडळांचा आदर्शवत सहभाग : उप महापौर शर्मिला बाबर

August 14, 2026

तिरंगा रॅलीतून पिंपरी-चिंचवड दुमदुमणार

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 20260

८.३३ टक्के प्रथा बोनस कायम; पाच वर्षांचा करार;महापालिका स्थायी समिती सभेत अध्यक्ष अभिषेक बारणे यांची…

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 14, 2026

दापोडीत गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

August 14, 2026

निगडी पोलिसांची कारवाई; २१६ ग्रॅम गांजासह तरुण ताब्यात

August 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?