निगडी प्रतिनिधी...निगडी पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत २४ वर्षीय तरुणाला २१६ ग्रॅम गांजासह ताब्यात घेतले. या गांजाची अंदाजे किंमत १० हजार ८०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.२५ वाजण्याच्या सुमारास पीसीएमसी कॉलनीच्या भिंतीजवळ, सर्व्हिस रोडच्या फुटपाथवर, अंकुश चौकाजवळ, ओटा स्कीम, निगडी येथे ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी कुलदीप संजय देवरे (वय २४, रा. संग्रामनगर झोपडपट्टी, अंकुश चौक, ओटा स्कीम, निगडी; मूळ रा. वसमत, जि. हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यात २१६ ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीररीत्या आढळून आल्याने निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५४३/२०२६ नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली आजगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास व पुढील कार्यवाही निगडी पोलीस करीत आहेत.