Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»पिंपरी-चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची नोंद
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

पिंपरी-चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची नोंद

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 11, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

ऑनलाइन फसवणूक, गांजा, हत्यारे, चोरीसह मारहाणीच्या घटना

पिंपरी-चिंचवड, दि. ११ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १० ऑगस्ट रोजी विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये कारची तोडफोड करून लूट, अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, हत्यार बाळगणे, गांजा बाळगणे, वाहन चोरी तसेच अपघाताच्या घटनांचा समावेश आहे.

कारची तोडफोड करून दीड हजारांची लूट

वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४००/२०२६ नोंदविण्यात आला आहे. थेरगाव येथील आनंद हॉस्पिटलजवळ फिर्यादी वैभव नळगिरे यांनी त्यांची कार पार्क केली असताना निरज सोळंकी व सुरज सोळंकी यांनी कारच्या काचा पेव्हर ब्लॉक, विटा व कोयत्याने फोडून नुकसान केले. फिर्यादीने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता कोयता गळ्याला लावून त्यांच्या खिशातील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार आहे.

अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षीय मयुरी धरणे हिला साहिल दणाणे याने फोनवरून प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यानंतर संशय घेऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या त्रासामुळे मयुरीने आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली आहे. याप्रकरणी साहिल दणाणे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

APK फाइलच्या माध्यमातून ६ लाख ७० हजारांची ऑनलाइन फसवणूक

सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१०/२०२६ दाखल झाला आहे. ६१ वर्षीय निवृत्त व्यक्तीला EMISÉO डेट बदलण्यासाठी APK फाइल डाउनलोड करण्यास सांगून आरोपींनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ६ लाख ७० हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक तसेच रक्कम स्वीकारणाऱ्या बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

किवळे व मॅगझीन चौक परिसरात ‘पिटा’ कायद्यान्वये कारवाई

देहूरोड पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. किवळे येथील जुन्या बेंगळुरू-मुंबई महामार्गालगत सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण केल्याचा आरोप संबंधित महिलेवर आहे.

दिघी पोलीस ठाण्यातही मॅगझीन चौक परिसरात अशाच स्वरूपाच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये पिटा कायद्याच्या कलम ८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जमिनीच्या वादातून वृद्ध महिलेला मारहाण

चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६५७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भोसे येथील जमीन गट क्रमांक ८२२ येथे कंपाउंड करण्यासाठी गेलेल्या ७८ वर्षीय सुलाबाई बो-हाडे यांच्याशी जमिनीच्या ताब्यावरून वाद झाला. आरोपींनी लाकडी दांडक्याने त्यांच्या खांद्यावर मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद आहे.

भरधाव कारच्या धडकेत पादचारी जखमी

वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. कस्पटे चौक येथे बालेवाडीहून पिंपळे सौदागरकडे जात असताना पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारने एका व्यक्तीला धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला गुडघ्याखाली फ्रॅक्चर झाले असून, कारचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

कुदळवाडी येथे दुचाकी चोरी

चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. कुदळवाडी येथील अपना वजन काट्याजवळ पार्क केलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार आहे.

भुगाव येथे सुमारे दोन किलो गांजा जप्त

बावधन पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा क्रमांक ३३२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भुगाव येथील अमन होंडा परिसरात रुपेश शेट्टी याच्या ताब्यात सुमारे १ किलो ९९२ ग्रॅम गांजा, अंदाजे १ लाख रुपये किमतीचा, आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. हा गांजा विक्रीसाठी कृष्णा साखरे याने दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रुपेश शेट्टीला अटक करण्यात आली आहे.

आळंदी परिसरात विनापरवाना कोयता बाळगल्याप्रकरणी कारवाई

आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९२/२०२६ दाखल झाला आहे. चऱ्होली खुर्द येथील प्लुमेरिया मंगल कार्यालयाजवळ पंकज कांबळे याच्याकडे विनापरवाना लोखंडी कोयता आढळून आला. पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही कारवाई करण्यात आली आहे.

चाकणमध्ये तरुणाकडून कोयता जप्त

चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६५६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. चाकण गावाच्या हद्दीत कृष्णा भंडलकर याच्याकडे काळ्या-हिरव्या रंगाच्या प्लास्टिक मुठीचा लोखंडी कोयता आढळून आल्याने भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून तपास सुरू असून, आरोपींची भूमिका व घटनांमागील नेमकी कारणे तपासली जात आहेत.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous ArticleRTO प्रशासनासोबत यशस्वी बैठक; १५ ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित
Next Article कामगारांच्या हक्कांवर गदा आणाल तर ‘स्वराज्य’ गप्प बसणार नाही!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?