पिंपरी,तळवडे प्रतिनिधी : रुपीनगर पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या हनुमान मंदिरासमोरील सार्वजनिक रस्त्यावरून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेल्याची घटना शनिवारी (८ ऑगस्ट) सकाळी घडली.
याप्रकरणी मोहीत कुमार रामेश्वर यादव (वय ३०, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मित्राच्या नावावर असलेली मोटारसायकल ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.२५ ते १०.४० वाजण्याच्या दरम्यान रुपीनगर पोलीस चौकीपासून थोड्या अंतरावर हनुमान मंदिरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर उभी करण्यात आली होती. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने मोटारसायकल चोरून नेली.
घटनेनंतर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिली. ८ ऑगस्ट रोजी रात्री १०.१३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.