निगडी, दि. ६ ऑगस्ट : निगडी परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत ५३० ग्रॅम गांजासह दोघांना अटक केली. या कारवाईत रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१९/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई गोविंद देवराव डोके (अंमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल विलास शिगवण (वय ३४) आणि प्रशांत रावसाहेब बनसोडे (वय २३, दोघेही रा. अजिंठानगर, निगडी) यांना अटक करण्यात आली.
दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १.३४ वाजण्याच्या सुमारास सुविधा हॉस्पिटलजवळील पत्राशेड परिसरात आरोपींकडे बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ५३० ग्रॅम गांजा, १,२०० रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल आढळून आला. चौकशीत हा गांजा खेड शिवापूर परिसरातील ‘लिंबा बाळया’ नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुटे करत आहेत.