भोसरी एमआयडीसी दि. ६ ऑगस्ट : मोशी येथील सारिका बोऱ्हाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरील रस्त्यावर भरधाव व निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने पादचारी महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण चंदन सहानी या रस्ता ओलांडत असताना एमएच १४ डब्ल्यू ५७०४ क्रमांकाची दुचाकी भरधाव वेगाने व वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चालविणाऱ्या अभिषेक सुरेश देशमुख (वय २१, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) याने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात किरण सहानी या गंभीर जखमी झाल्या.
या प्रकरणी त्यांचे पती चंदन रामनारायण सहानी (वय ३३, रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.