Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»स्थायी समितीच्या सभेत पशुवैद्यकीय सेवा, क्रीडा सुविधा, शिष्यवृत्ती, पायाभूत सुविधा व आपत्कालीन सेवांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
पिंपरी चिंचवड

स्थायी समितीच्या सभेत पशुवैद्यकीय सेवा, क्रीडा सुविधा, शिष्यवृत्ती, पायाभूत सुविधा व आपत्कालीन सेवांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. ५ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज बाबासाहेब त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नागरिकांच्या दैनंदिन सेवांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मान्यता देण्यात आली.

पशुवैद्यकीय सेवा अखंडित ठेवणे, क्रीडा सुविधा व खेळाडूंना प्रोत्साहन, शहरातील पायाभूत सुविधांची दुरुस्ती, आपत्कालीन व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता तसेच शैक्षणिक व आरोग्य क्षेत्राशी निगडित विविध विषयांवर यावेळी निर्णय घेण्यात आले.

सभेत पशुरुग्णालयातील पशुशल्यचिकित्सक, पशुवैद्यकीय अधिकारी, पॅरावेट कर्मचारी व इतर आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याच्या सेवेला नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा, प्राणिसंग्रहालयातील सेवा तसेच भटक्या प्राण्यांशी संबंधित अत्यावश्यक सेवा अखंडित सुरू राहण्यास मदत होणार आहे.

महापालिकेच्या विविध विभागांसाठी आवश्यक फर्निचर व साहित्य खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच शहरातील रस्ते, बीआरटी रेलिंग, फुटपाथ दुरुस्ती आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वार्षिक परीक्षेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या पंपांच्या संचालन व देखभालीसाठी आवश्यक कार्यवाहीस मंजुरी देण्यात आली.

वायसीएम रुग्णालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीस नामकरण करण्याचा प्रस्ताव महापालिका सभेकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सार्वजनिक शौचालये व मुताऱ्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई आणि देखभालीच्या कामास मान्यता देण्यात आली.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या आपदा मित्र व ट्रेनी फायरमन यांच्या मानधनासाठी आवश्यक तरतूद करण्यासही मान्यता देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध राहावे, यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील स्वच्छता, देखभाल व उद्यान व्यवस्थापनाच्या कामास मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे क्रीडा सुविधांची योग्य देखभाल होऊन खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे.

महापालिकेच्या क्रीडा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती निधीत वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यासाठी आवश्यक खर्चास मंजुरी देण्यात आली.

स्थायी समितीचे अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले, “महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा कोणत्याही परिस्थितीत अखंडित राहाव्यात, शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात आणि क्रीडा, शिक्षण, आरोग्य तसेच नागरिकाभिमुख उपक्रमांना आवश्यक पाठबळ मिळावे, या उद्देशाने आज विविध महत्त्वपूर्ण विषयांना मान्यता देण्यात आली आहे. नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत सेवा उपलब्ध करून देणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शहराच्या विकासाला गती देणाऱ्या आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या कामांना स्थायी समितीच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाईल.”

सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध निर्णयांमुळे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा, क्रीडा सुविधा, सार्वजनिक स्वच्छता, पायाभूत सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापन तसेच शैक्षणिक व आरोग्यविषयक सेवांना अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविशेष शाखा-२ कार्यालयाचे नूतनीकरण; आधुनिक सुविधांसह नवीन कार्यालयाचा शुभारंभ
Next Article उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते हॅकेथॉन २०२५च्या विजेत्यांचा करण्यात आला गौरव
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?