Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»चाकण एमआयडीसी औद्योगिक संघटनेला ‘उद्योजक सपोर्ट’ पुरस्कार
पुणे

चाकण एमआयडीसी औद्योगिक संघटनेला ‘उद्योजक सपोर्ट’ पुरस्कार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जेआरडी टाटा जयंतीनिमित्त आंत्रप्रेन्यूअर्स इंटरनॅशनलकडून गौरव; उद्योजकांच्या विकासासाठीच्या कार्याचा सन्मान

पुणे (प्रतिनिधी) : भारतरत्न जेआरडी टाटा यांच्या जयंतीनिमित्त आंत्रप्रेन्यूअर्स इंटरनॅशनलच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात चाकण एमआयडीसी औद्योगिक संघटनेला ‘उद्योजक सपोर्ट पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. चाकण आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी पुरस्कार स्वीकारला.

कोथरूड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला तंत्रज्ञान तज्ज्ञ व ज्येष्ठ लेखक डॉ. अच्युत गोडबोले, आंत्रप्रेन्यूअर्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष अमोल जाधव, सचिव सुभाष माईणकर, खजिनदार सुनील थोरात, समन्वयक अतुल कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील उद्योजक व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चाकण एमआयडीसी औद्योगिक संघटनेचे सचिव निवास माने, खजिनदार किसन गायकवाड, संचालक सुधीर भांदुर्गा, प्रवीण शिंदे, दत्तात्रय दगडे, लक्ष्मण काळे, प्रशांत गोरे, रामेश्वर पवार, प्रफुल्ल कालंकार, अभय सोनावणे, सुभाष गोळे, मुलानी, प्रशांत लुमधे, गोविंद इंगळे आणि शिवशंकर शेट्टी उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी चाकण औद्योगिक परिसरातील समस्यांकडे लक्ष वेधताना सांगितले की, “चाकण एमआयडीसीमधून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होतो. मात्र, या औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि इतर मूलभूत प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. या समस्या तातडीने सोडविण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. उद्योजकांच्या हितासाठी चाकण एमआयडीसी औद्योगिक संघटना सातत्याने कार्यरत राहील.”

इतर पुरस्कार विजेते…..

💮उद्योजकतेतील उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार : प्रवीण गुरव, संदेश सावंत, शितलकुमार पाटील आणि दयानंद पाटील (स्पीड इंजिनिअरिंग सोल्युशन्स प्रा. लि., पुणे).

💮संशोधन व नवोपक्रम क्षेत्रातील उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार : शिवाजी वाघमारे (क्यू साइन एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि., पुणे).

💮सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार : डॉ. अमेय पांगारकर (ए कन्सल्टन्सी, पुणे).

💮सामाजिक दायित्व उद्योजकता पुरस्कार : राहुल कोकीळ (सुमंथन लर्निंग रिसोर्स, पुणे).

💮कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य पुरस्कार : आकाशचंद्र गौरठाकूर (आकाश ॲग्री सोल्युशन्स प्रा. लि., सिल्लोड).

💮ग्रीन एंटरप्राइज अवॉर्ड : डॉ. अस्मिता प्रभुणे (ग्रीन पिरॅमिड बायोटेक, पुणे).

Post Views: 40
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपरराज्यातील मजुरांना लुटणारी टोळी जेरबंद; जबरी चोरीचे तीन गुन्हे उघड, दोन सराईत आरोपी अटकेत
Next Article ‘दादा’ : शिक्षणातून राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणारा महामानव – डॉ.भरत चव्हाण पाटील
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?