Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»अमरावती»साखळी धरणाच्या बॅकवॉटरमुळे शेती उद्ध्वस्त; मलकापूर गावाच्या पुनर्वसनाची मागणी तीव्र
अमरावती

साखळी धरणाच्या बॅकवॉटरमुळे शेती उद्ध्वस्त; मलकापूर गावाच्या पुनर्वसनाची मागणी तीव्र

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

धरणाच्या पाण्याने गावाला चारही बाजूंनी वेढा; पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती | प्रतिनिधी – नितेश कानबाले..…अमरावती जिल्ह्यातील नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यात ३० जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि साखळी धरण ओव्हरफ्लो झाल्याने निर्माण झालेल्या बॅकवॉटरच्या तडाख्यात मौजा मलकापूर (ढेंगाळा) परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो एकरांवरील पिके पाण्याखाली गेली असून शेतीचे बांध फुटल्याने नुकसानाची तीव्रता अधिक वाढली आहे.

गावालगत असलेल्या साखळी नदी व नाल्यांमध्ये धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने नदीकाठावरील शेतीमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिके वाहून गेली असून अनेक शेतजमिनी चिखलमय झाल्या आहेत. दरवर्षी बॅकवॉटरमुळे अशाच प्रकारचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

गावाला पाण्याचा विळखा; रात्रभर जागून काढली रात्र

साखळी धरणाच्या बॅकवॉटरमुळे मलकापूर गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढा घातला होता. गावाकडे जाणारा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने मलकापूर, खानापूर आणि गोडेगाव या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला. भीतीच्या वातावरणात गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली.

दरम्यान, एक व्यक्ती कमी पाण्याचा अंदाज घेऊन गावाकडे येत असताना गावाभोवती पाण्याचा वेढा निर्माण झाल्याने मध्येच अडकली. रात्री उशिरापर्यंत तिचा संपर्क होत नसल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले होते. अखेर मध्यरात्रीनंतर ती व्यक्ती जंगलाच्या मार्गाने सुरक्षित घरी परतल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

“सरकार, आमचे पुनर्वसन करा” – गावकऱ्यांची आर्त हाक

“अशीच परिस्थिती कायम राहिली तर एक दिवस मलकापूर गाव नकाशावरूनच नाहीसे होईल. मध्यरात्री अचानक पूर आल्यास झोपेतच जीव गमवावा लागेल,” अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मलकापूर गावाचे तातडीने सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी गावकऱ्यांनी एकमुखाने केली आहे.

२०२१ नंतर वाढले संकट…..

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, २०२१ मध्ये साखळी धरण प्रकल्प उभारल्यानंतर बॅकवॉटरची समस्या तीव्र झाली आहे. धरण होण्यापूर्वी एवढ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत नव्हते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पावसाळ्यात नदीकाठच्या जमिनींमध्ये पाणी घुसून पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती पाहणी

या गंभीर परिस्थितीची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मलकापूर गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. मात्र अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना किंवा पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या….

💮मलकापूर गावाचे तातडीने पुनर्वसन करावे.

💮नुकसानग्रस्त शेतीचे त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी.

💮बॅकवॉटरचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना कराव्यात.

💮पूरस्थितीत गावांचा संपर्क तुटू नये यासाठी उंच पूल व पर्यायी रस्त्यांची उभारणी करावी.

💮दरवर्षी होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा.

या संपूर्ण परिस्थितीची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दूरध्वनीद्वारे आमदार प्रतापदादा अडसड यांनाही दिली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

Post Views: 24
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
Next Article पोक्सो प्रकरणातील आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत वाय. ई. एस. इंग्लिश स्कूलची बाजी

September 2, 2026

उपाध्यक्षपदी निवडीनंतर अमरावतीत सत्कार; सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याचा निर्धार

August 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?