Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा दिलासा
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा दिलासा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 30, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

१०, २० व ३० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

पिंपरी-चिंचवड, दि. २९ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना पहिला, २० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना दुसरा तसेच ३० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना तिसरा लाभ मंजूर करण्यात आला असून, त्याबाबतचे स्वतंत्र प्रशासकीय आदेश जारी करण्यात आले आहेत.

 

महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर शासन निर्णय, पदोन्नती समितीचे निर्णय तसेच सेवाप्रवेश नियमांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ देताना कर्मचाऱ्यांची नियमित सेवा, पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता, विभागीय परीक्षा, गोपनीय अहवाल, प्रलंबित विभागीय चौकशी, न्यायालयीन प्रकरणे तसेच इतर सेवा अटींची पडताळणी करण्यात येणार आहे. पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या विद्यमान वेतनश्रेणीतील पुढील वेतनस्तराचा लाभ मंजूर करण्यात येईल.

नवीन सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम, २०२० लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या तसेच त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निकष निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मंजूर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेला न्याय मिळण्यासोबतच त्यांच्या मनोबलातही निश्चितच वाढ होणार आहे.

या निर्णयाअंतर्गत १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या २१६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिला लाभ, २० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या ३१९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुसरा लाभ, तर ३० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या २३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना तिसरा लाभ मंजूर करण्यात आला आहे. संबंधित विभागामार्फत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत आहे.

“महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होण्यासोबतच प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल. पात्र सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमानुसार या योजनेचा लाभ देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे.”

– डॉ. विजय सूर्यवंशी,आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

“सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत असून, पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमानुसार लाभ दिला जात आहे. आवश्यक कागदपत्रे, सेवा अभिलेख व प्रशासकीय पूर्तता पूर्ण होताच उर्वरित पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येईल. कर्मचारी हिताला प्राधान्य देत ही प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.”

– विक्रांत बगाडे,अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleताथवडेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराविरोधात जनआक्रोश मोर्चा
Next Article शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरूंचा गुरुपौर्णिमेनिमित्त महापालिकेकडून गौरव
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?