Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मतदार यादीत नाव निश्चित करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरा
पिंपरी चिंचवड

मतदार यादीत नाव निश्चित करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 28, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड महापालिकेचे नागरिकांना आवाहन

पिंपरी, दि. २८ जुलै २०२६ :विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) – २०२६ कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील सर्व पात्र नागरिकांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे.

वेळेत अर्ज सादर करणाऱ्या पात्र मतदारांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत बीएलओंकडून घरभेटी देत गणना अर्जांचे वितरण व संकलन सुरू आहे. शहरातील प्रत्येक पात्र नागरिकाचे मतदार यादीत नाव समाविष्ट व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे मतदार यादीत नाव असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शहरातील सर्व पात्र नागरिकांनी गणना अर्ज वेळेत भरून संबंधित बीएलओकडे जमा करावा. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या नावाची खात्री करून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे अथवा हरकती दाखल कराव्यात. एकही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.”

अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन करताना म्हटले की, “विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची अंमलबजावणी शहरात नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. बीएलओंना आवश्यक सहकार्य करून नागरिकांनी गणना अर्ज वेळेत सादर करावेत. ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.”

गणना अर्ज वेळेत भरून सादर करणाऱ्या नागरिकांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या पात्र नागरिकांची नावे समाविष्ट झालेली नसतील किंवा नव्याने मतदार म्हणून नोंदणी करावयाची असेल, त्यांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्रमांक ६ भरून अर्ज करता येणार आहे. तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्रमांक ८, तर चुकीच्या अथवा अपात्र नोंदी वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ सादर करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

उप आयुक्त सचिन पवार म्हणाले की, “पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशीलांची खात्री करावी. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आवश्यक असल्यास नमुना ६, ७ किंवा ८ द्वारे विहित कालावधीत अर्ज सादर करून नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात” .

शहरातील सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि कोणताही विलंब न करता ८ ऑगस्ट २०२६ पूर्वी गणना अर्ज भरून संबंधित बीएलओकडे जमा करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड शहरासाठी हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट आणि ई-आरटीएस प्रकल्पाला गती
Next Article तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल; सायबर फसवणूक व दुचाकी चोरीची प्रकरणे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?