हिंजवडी, दि.२७ जुलै २०२६ : हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत विहित वेळेपेक्षा जास्त वेळ विनापरवाना आस्थापना सुरू ठेवून खाद्यपदार्थ व मद्यविक्री करणाऱ्या दोन बारवर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई केली.
आज (दि. २६) मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई गणेश सावंत (ब.क्र. २६४३), विनोद वीर (ब.क्र. २९४७) आणि हर्षद कदम (ब.क्र. ३०३४) यांनी ही कारवाई केली.
कारवाईदरम्यान खालील आस्थापना पहाटेच्या वेळी विनापरवाना सुरू असल्याचे तसेच खाद्यपदार्थ व मद्यविक्री करत असल्याचे निदर्शनास आले.२१ लॉज अँड बार, विप्रो सर्कल, हिंजवडी, पुणे,इको क्लब अँड बार (द सोशल स्ट्रीट), हिंजवडी, पुणे या बारकर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी संबंधित आस्थापनांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३(क्ष) सह कलम १३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.