पिंपरी,काळेवाडी (प्रतिनिधी): काळेवाडी पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीप्रकरणी एका बँक खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ३१८(४), ३(५), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(डी) तसेच भादंवि कलम ४२०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी काळेवाडी परिसरात घडलेल्या सायबर फसवणुकीच्या तपासादरम्यान PNB बँकेचे खाते क्रमांक १८५३१००१०००२६९१७ हे खाजणा दोलष्णा शिंगे (रा. कोकणेनगर, काळेवाडी, रहाटणी, पुणे) यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले.
तपासात संबंधित खातेदाराने स्वतःचे बँक खाते सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी साथीदारांना वापरण्यास दिल्याचे समोर आले. या खात्यातून फिर्यादीचे ₹२५,००० एटीएमद्वारे काढून घेतल्याचे तपासात उघड झाले असून, आरोपी हा संघटित सायबर गुन्हेगारी गटाचा सदस्य म्हणून कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई तेजस दिपक जगताप यांनी फिर्याद दिली असून, २६ जुलै २०२६ रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
