Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»पिंपरीतील कपडा मार्केटमध्ये कोयत्याचा धाक दाखवत दरोडा
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

पिंपरीतील कपडा मार्केटमध्ये कोयत्याचा धाक दाखवत दरोडा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

एक विधिसंघर्षित बालक ताब्यात, दोघांचा शोध

पिंपरी (प्रतिनिधी) : पिंपरीतील रिव्हर रोड परिसरातील कपडा मार्केटमध्ये भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवत दुकानात घुसून रोकड आणि पूजेचे साहित्य लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे, तर आणखी दोन विधिसंघर्षित बालकांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.२२ वाजण्याच्या सुमारास रिव्हर रोडवरील कपडा मार्केटमधील ‘चॉईस व्हरायटी’ या दुकानात ही घटना घडली. फिर्यादी हर्ष प्रदीप पागराणी (वय २१, रा. पिंपरी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी, त्यांचे वडील आणि तीन कामगार दुकानात असताना तीन आरोपी कोयते घेऊन दुकानात घुसले. त्यांनी “हप्ता” म्हणून पैशांची मागणी करत कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील ३० हजार रुपये रोख, पूजेसाठी ठेवलेले पितळी नाणे आणि गुरु झुलेलाल यांचा फोटो जबरदस्तीने घेऊन पळ काढला.

दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी फायटरसारख्या धारदार हत्याराने त्यांच्या डाव्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. आजूबाजूचे दुकानदार मदतीला धावून येताच आरोपींनी कोयते उगारून “जो मध्ये येईल त्याचे तुकडे करू” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे अनेक दुकानदारांनी भीतीपोटी आपली दुकाने बंद केली.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५८/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे, भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस करीत आहेत.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; महिला व दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, एक गंभीर जखमी
Next Article काळेवाडीत सायबर फसवणुकीप्रकरणी बँक खातेदारावर गुन्हा दाखल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची नोंद

August 11, 2026

भोसरीत तीन पत्ती जुगारावर पोलिसांचा छापा; सात जणांवर कारवाई

August 9, 2026

रुपीनगरमध्ये मंदिरासमोरून मोटारसायकल चोरी

August 9, 2026

गहुंजे रस्त्यावर भरधाव कारची दुचाकीला धडक; १७ वर्षीय युवक गंभीर जखमी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?