Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»भोसरी-दिघी परिसर ‘‘मेट्रो कनेक्टिव्हीटी’’ बाबत ‘‘नो कॉम्प्रमाईज’’
पिंपरी चिंचवड

भोसरी-दिघी परिसर ‘‘मेट्रो कनेक्टिव्हीटी’’ बाबत ‘‘नो कॉम्प्रमाईज’’

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भाजपा आमदार महेश लांडगे यांची बैठकीत स्पष्ट इशारा;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर होणार कार्यवाही

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी…..भोसरी, दिघी आणि परिसरातील सुमारे पाच लाख नागरिकांना मेट्रो सेवेपासून वंचित ठेवून कोणताही आराखडा मंजूर होणार नाही. भोसरी गावातून मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नसून, नागरिकांच्या हक्काची मेट्रो सेवा मिळवून देण्यासाठी ‘नो कॉम्प्रमाईज’ची भूमिका घेण्यात आली आहे, असा स्पष्ट इशारा भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिला.

पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत भक्ती शक्ती- वाकड- नाशिक फाटा- चाकण मेट्रो मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) सादरीकरणावेळी भोसरीतील मेट्रो कनेक्टिव्हिटीचा मुद्दा आमदार लांडगे यांनी ठामपणे उपस्थित केला. यावेळी महापौर रवि लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह महामेट्रो आणि महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आमदार लांडगे यांनी भोसरी गावातून मेट्रो मार्गिकेच्या नियोजनाबाबत भूमिका स्पष्ट करताना, “भोसरी, दिघी आणि परिसरातील लाखो नागरिकांच्या सोयीचा विचार करून मेट्रो कनेक्टिव्हिटी सुनिश्चित झालीच पाहिजे. यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही,” असे स्पष्टपणे सांगितले. यावर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनी, भोसरीतील प्रस्तावित मेट्रो मार्गिकेसाठी विद्यमान उड्डाणपूल पाडण्याची वेळ येऊ शकते, असे सांगितले. पण, भोसरी, दिघी आणि परिसरातील सुमारे पाच लाख नागरिकांना त्यांच्या हक्काची मेट्रो सेवा मिळालीच पाहिजे. नागरिकांच्या हितापेक्षा कोणतीही बाब मोठी नाही,” असे आमदार लांडगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक…

तसेच, मेट्रो कनेक्टिव्हिटीचा हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून, त्यांच्या उपस्थितीत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींचा सविस्तर आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही निश्चित करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, भोसरी एमआयडीसी, मोशी, चऱ्होली, दिघी आणि आळंदी रोड परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, भविष्यातील वाहतुकीच्या गरजांचा विचार करून मेट्रोचे जाळे सर्व भागांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भोसरीतील मेट्रो कनेक्टिव्हिटी हा केवळ एका भागाचा प्रश्न नसून, शहराच्या भविष्यातील विकासाशी निगडित विषय असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

“भोसरी, दिघी आणि परिसरातील सुमारे पाच लाख नागरिकांना हक्काची मेट्रो सेवा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही. या भागातील नागरिकांना मेट्रोपासून वंचित ठेवणार नाही. मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत लवकरच बैठक होईल आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुणे मेट्रो टप्पा-२ ला वेग; भक्ती-शक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गाचा सुधारित डीपीआर सादर
Next Article महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक,कवी,साहित्यिक तसेच अभिनेते व दिग्दर्शक रमेश वाकनीस यांचा मानपत्र देऊन गौरव
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?