दापोडी (प्रतिनिधी): दापोडी परिसरात अवैधरीत्या विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या एका महिलेविरुद्ध दापोडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास जायका बिर्याणीसमोर, पुणे–मुंबई महामार्गालगत, सी.एम.ई. गेटसमोरील सार्वजनिक फूटपाथवर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी ३६ वर्षीय महीलेला ताब्यात घेण्यात आले आहे .तिच्याकडून ₹५,७६० किमतीचे विदेशी कंपनीचे मद्य जप्त करण्यात आले. संबंधित महिला कोणताही वैध परवाना नसताना विदेशी मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन सुरेश संकुनहट्टे (दापोडी पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध दापोडी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक १९३/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहेत.