पिंपरी,(संत तुकाराम नगर) दि. २६ जुलै : अजमेरा परिसरातून उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अकील निजामुद्दीन अन्सारी (वय ३१, रा. बिल्डिंग क्र. ३४, वास्तू उद्योग सोसायटी, फ्लॅट क्र. ०१, अजमेरा, पिंपरी) यांनी तक्रार दिली आहे.
दि. २४ जुलै २०२६ रोजी रात्री १०.०० ते २५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० या कालावधीत जर्मन बेकरीसमोर उभी केलेली काळ्या-निळ्या रंगाची हिरो होंडा सीडी डिलक्स (एमएच १४ एआर ०५७१, मॉडेल २००५) ही अंदाजे ₹१०,००० किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच भा.दं.वि. कलम ३७९ अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पिंगळे करीत आहेत.