भोसरी,प्रतिनिधी दि. २६ जुलै : भोसरी पोलिसांनी अवैध देशी दारू तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करून त्याला अटक केली आहे.
भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३००/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम १२३, २२३, २७१, २७२, २७४, २७५ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४:४५ वाजता भोसरी येथील जय गणेश पान शॉप, विश्व विलास बिर्याणी हाऊसजवळ करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हवालदार अशोक आबासाहेब माने (भोसरी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी विश्वंभरनाथ फोजदार यादव (वय ४५) याला अटक केली असून तो भोसरीतील डोळस वस्ती येथे वास्तव्यास आहे. आरोपीकडून ₹१८,७९६ किमतीचा विनापरवाना देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपीकडे शासनाने १३ जुलै २०२६ पासून एका वर्षासाठी प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांचा साठाही आढळून आला. मुखाचा कर्करोग व इतर गंभीर आजार होऊ शकतात, याची माहिती असूनही प्रतिबंधित पदार्थांचा साठा व विक्री केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दांडे करीत आहेत.