चिखली, दि. २५ जुलै : चिखली पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत ललितकुमार रावल (रा. फ्लॅट क्र. ३०१, समृद्धी ऋतुगंध सोसायटी, पाण्याच्या टाकीजवळ, पाटीलनगर, चिखली, पुणे) याने एचडीएफसी बँकेत खाते उघडून साथीदारांशी संगनमताने आर्थिक फसवणुकीसाठी त्याचा वापर केल्याचा आरोप आहे.
या खात्यामार्फत ₹१ लाखांचे आर्थिक व्यवहार करण्यात आले. तपासादरम्यान देशातील तीन नागरिकांची एकूण ₹१.७० लाखांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४९२/२०२६ दाखल करण्यात आला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच भारतीय दंड संहितेचे कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि मोटे करीत आहेत.