Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»महाळुंगे पोलिसांची घरफोडी उघड; चार आरोपी अटकेत, १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

महाळुंगे पोलिसांची घरफोडी उघड; चार आरोपी अटकेत, १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चाकण उत्तर म्हाळुंगे : महाळुंगे इंगळे (ता. खेड, जि. पुणे) येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उत्तर महाळुंगे पोलिसांनी चार महिन्यांच्या अथक तपासानंतर पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने, किंमत ₹१२.६० लाख, जप्त करण्यात आले आहेत.

महाळुंगे इंगळे येथील रहिवासी सौ. कविता मदन कड या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्या यात्रेनिमित्त मूळ गावी गेल्या असताना ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या गाळ्याचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू ठेवला.

दरम्यान, पोलीस अंमलदार संतोष काळे व शुभम खंडागळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मुख्य आरोपी निक्कुकुमार देवकी सिंग हा चोरीचे सोने घेऊन बिहारला पळून गेल्याची माहिती दिली. तपासात आरोपीने त्याचा भाऊ रंजनकुमार सिंग याच्या मदतीने दागिने लपविल्याचेही निष्पन्न झाले.

चार महिन्यांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर पोलिसांनी रंजनकुमार सिंग याला मुंबईतून, तर निक्कुकुमार सिंग याला बेंगळुरूहून ताब्यात घेतले. आरोपींच्या कबुलीनुसार पोलिसांचे पथक बिहारमधील सितामढी येथे गेले आणि तेथून चोरीस गेलेले १४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले.

निक्कुकुमार देवकी सिंग (वय २२, जि. सितामढी, बिहार),रंजनकुमार देवकी सिंग (वय २०, जि. सितामढी, बिहार),राजकुमार ऊर्फ प्रिन्सकुमार विजय पासवान (वय १९, जि. रोहतास, बिहार),डिंपल पटेल विनोद सिंग (वय २६, जि. कैमूर-भभुआ, बिहार) अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे करीत आहेत.

Post Views: 22
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअजित पर्व पुस्तकाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रकाशन
Next Article ‘ग्यानबा तुकाराम’ या जयघोषात ज्येष्ठ नागरिक संघाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?