पिंपरी-चिंचवड, दि.२४ जुलै : भोसरी पोलिसांनी सायबर आर्थिक फसवणुकीप्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपींनी संघटित गुन्हेगारीच्या उद्देशाने कट रचून बँक खाते उघडून आर्थिक व्यवहार करत देशातील तीन नागरिकांची एकूण ₹ १,८०,३४६ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र, डी. पी. लांडगे बिल्डिंग, लांडेवाडी चौक, भोसरी येथे उघडलेल्या खाते क्रमांक ६०५६५३८३७५३ चा वापर करून हा प्रकार घडला.
या प्रकरणी २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.५९ वाजता भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४) व संबंधित कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणात चिंतामणी सिद्धेश्णा पुजारी (रा. बालाजीनगर, टेल्को रोड, निळा झेंडा चौक, भोसरी) व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लबडे करीत आहेत.