हिंजवडी, दि. २४ जुलै: हिंजवडी पोलीस ठाण्यात संघटित सायबर फसवणुकीप्रकरणी एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.३८ ते ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३६ या कालावधीत के.पी.आय.टी. कंपनीजवळ, गेट क्रमांक २४३, हिंजवडी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी महेश भास्कर दवंगे (पोलीस शिपाई, हिंजवडी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली असून २३ जुलै २०२६ रोजी रात्री ९.०५ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांच्या तपासात, बँक ऑफ महाराष्ट्रच्या ६०५६०२३५८३४ या खात्याचा वापर करून महिला आरोपीने तिच्या साथीदारांसह संगनमताने संघटित सायबर गुन्हेगारी टोळीचा सदस्य म्हणून हे खाते आर्थिक व्यवहारांसाठी उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. या खात्यात एनसीसीआरपी (NCRP) पोर्टलवरील ९ तक्रारींमधील एकूण ६ लाख ९७ हजार रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर ही रक्कम एटीएमद्वारे काढून घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११२(२),६१(२), ३१८(४), ३१७(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे करीत आहेत.