Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»सांगवी किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे सबवे बांधणे व सांगवी फाटा येथे महात्मा ज्योतिबा फुले पुलाखालील बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्पाचे आमदार शंकर जगताप यांचे हस्ते लोकार्पण
पिंपरी चिंचवड

सांगवी किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे सबवे बांधणे व सांगवी फाटा येथे महात्मा ज्योतिबा फुले पुलाखालील बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्पाचे आमदार शंकर जगताप यांचे हस्ते लोकार्पण

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 23, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर

पिंपरी, दि. २३ जुलै २०२६– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहरात विविध विकासकामे करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून नव्याने विकसित करण्यात आलेल्या सांगवी किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे सबवे बांधणे तसेच महात्मा ज्योतिबा फुले पुलाखाली तयार करण्यात आलेल्या बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्पाचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.

सांगवी येथील महात्मा फुले उड्डाणपूलाखालील झालेल्या कार्यक्रमास ‘ह’ प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे ,शिक्षण समिती सभापती रविना आंघोळकर, नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, शशिकांत कदम, शाम जगताप, नवनाथ जगताप,दिप्ती कांबळे,पल्लवी जगताप, शहर अभियंता मनोज सेठीथा,सह शहर अभियंता बापू गायकवाड,कार्यकारी अभियंता सुनिल पवार,उप अभियंता चंद्रकांत मोरे तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुलाखालील मोकळ्या जागेचा प्रभावी वापर करत बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये नागरिकांसाठी आकर्षक सुशोभीकरण, फिरण्यासाठी मार्ग, बैठकीची व्यवस्था, व्यायामासाठी सुविधा, खुली जागा तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी उपयुक्त परिसर विकसित करण्यात आला आहे. पूर्वी दुर्लक्षित असलेल्या जागेचे लोकाभिमुख सार्वजनिक स्थळात रूपांतर झाल्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून नागरिकांना दर्जेदार विरंगुळ्याचे केंद्र उपलब्ध झाले आहे.

शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन महापालिकेकडून सांगवी–किवळे मार्गावरील रक्षक चौक येथे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा व्हेईक्युलर अंडरपास (VUP) उभारण्यात आला आहे त्याचेही लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास ‘ज’ क्षेत्रीय अध्यक्षा आरती सुरेश चोंधे, नगरसदस्य अँड. विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, नगरसदस्या स्नेहा कलाटे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता प्रेरणा शिनकर, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, कार्यकारी अभियंता विजय भोजने, उपअभियंता निलेश दाते यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, विविध विभागांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे, काळूराम बारणे, भुलेश्वर नांदगुडे, काळूराम नानगुडे, अनिल संचेती, प्रसाद कस्पटे, बाळासाहेब चोंधे, तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी २२ कोटी ७७ लाख इतका खर्च आलेला असून या कामाचा आदेश ६ सप्टेंबर २०२४ रोजी देण्यात आला होता आणि प्रकल्पाचे काम १० जुलै २०२६ रोजी पूर्ण झाले आहे.या प्रकल्पांतर्गत सुमारे २६.४० मीटर लांबीचा व ११.४० मीटर रुंदीचा आरसीसी बॉक्स सबवे उभारण्यात आला आहे. तसेच सांगवी फाटा व जगताप डेअरी चौकाच्या बाजूस रॅम्पची उभारणी करण्यात आली असून पादचाऱ्यांसाठी २६.४० मीटर लांबीचा व २.५० मीटर रुंदीचा स्वतंत्र पदपथ विकसित करण्यात आला आहे. या सबवेमुळे सांगवी–किवळे मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक सिग्नलविरहित आणि अधिक सुरळीत होणार असून वाहतूक कोंडीत मोठी घट होईल. परिणामी नागरिकांचा प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच इंधनाची बचत आणि सुरक्षित प्रवासालाही चालना मिळणार आहे.

लोकार्पणानंतर बोलताना आमदार शंकर जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा दर्जेदार आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधा उभारणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले तसेच रस्त्यावरील वाहतूक ही कोंडीमुक्त, सुरक्षित करण्यासाठी महापालिका कामकाज करीत आहे तसेच नागरिकाभिमुख शहर उभारण्यासाठी भविष्यातही अशाच लोकहिताच्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहाळुंगे येथील बांधकाम साईटवरून रु.१.०५ लाखांच्या ॲल्युमिनियम तारा चोरी; कामगाराविरुद्ध गुन्हा
Next Article काळेवाडी कचरा संकलन केंद्राची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून पाहणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?