पुणे दिं.२३ जुलै : बावधन पोलिस ठाण्यात बांधकाम साईटवरील स्टोअररूममधून अॅल्युमिनियम तारा चोरी केल्याप्रकरणी एका कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १२ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास महाळुंगे (ता. मुळशी, जि. पुणे) येथील के.टी.पी. ग्रुपच्या बांधकाम साईटवर घडला. या प्रकरणी रविंद्र वासू तुपे (वय ५०, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यावरून २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.५१ वाजता बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
अतुल शंकर शिंगाडे (वय ३३, रा. तळवडे, पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०६ तसेच भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी हा साईटवर इलेक्ट्रीशियन म्हणून काम करत होता. त्याने स्टोअररूमचा उघडा दरवाजा पाहून संधी साधत सुमारे ११० किलो अॅल्युमिनियम तारा, अंदाजे ₹१,०५,६०० किमतीचा माल, फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरी करून नेल्याचा आरोप आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बत्तीसे करीत आहेत.