सांगवी दिं.२३ जुलै…पिंपळे गुरव येथील सुवर्णयुग कॉलनी परिसरातून पार्किंगमध्ये उभी असलेली होंडा युनिकॉर्न दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रशांत खेमा बडेकर (वय ३८, रा. सर्व्हे नं. ८५, सुवर्णयुग कॉलनी, जवळकरनगर, पिंपळे गुरव, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २० जुलै २०२६ रोजी रात्री ८ ते २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ या कालावधीत अशोक विहार शेजारील इमारतीसमोरील पार्किंगमधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मालकीची सुमारे ४० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न (मॉडेल २०२०, क्रमांक MH-14-JD-2434) ही दुचाकी चोरून नेली.
या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६९/२०२६ नोंद करण्यात आला असून बीएनएस कलम ३०३(२) (पूर्वीचे भादंवि कलम ३७९) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माळेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.