पुणे (हिंजवडी) दि.२३ जुलै : हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ४८४/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम १०३(१) (पूर्वी भादंवि कलम ३०२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी मुळशी तालुक्यातील नेरे येथील मेमाणे वस्ती, सर्व्हे क्रमांक ६१ परिसरातील विहिरीत घडली. या प्रकरणी त्याच दिवशी सायंकाळी ६.५६ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
या प्रकरणी रामदास पांडुरंग मेमाणे (वय ६३, रा. बीआयएमएम कॉलेजसमोर, नेरे, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी संतू ऊर्फ विशाल बासुदेव मानी (वय २२, मूळ रा. विष्णुपूर, जि. नाडिया, पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे.
फिर्यादीनुसार, सुमन पात्रा (मूळ रा. मिगुलताला, जि. नाडिया, पश्चिम बंगाल; सध्या रा. नेरे येथील बांधकाम साईट) याच्या डोक्यावर व कपाळावर कठीण वस्तूने वार करण्यात आले. त्यानंतर त्याचे हात, पाय आणि कंबरेला वायर बांधून विहिरीत फेकून देत त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.