रुपये ११ लाखांची रक्कम काढल्याचा आरोप
पिंपरी, दि.२३ जुलै: पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून देत संघटित सायबर गुन्हेगारीत सहभाग घेतल्याप्रकरणी एका महिला खातेदारासह तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३१७(२), ३(५) तसेच भारतीय दंड संहिता कलम ४२०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस शिपाई श्रीकांत सुनिल कबुले (सायबर पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी म्हणून यूको बँकेच्या खाते क्रमांक १९७००२१०००५२३१ची खातेदार पेन्नी हेन्री पॉवेल आणि तिच्या साथीदारांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या नावावर यूको बँकेचे खाते उघडून ते सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी साथीदारांना वापरण्यास दिले. या खात्यातून तीन वेगवेगळ्या तक्रारींमधील तक्रारदारांची एकूण ११ लाख रुपयांची रक्कम जमा झाल्यानंतर ती धनादेशाद्वारे काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हा गुन्हा २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.०९ वाजता दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.