पिंपरी-चिंचवड : उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंपनीच्या ताब्यातील सुमारे ₹७७ हजारांहून अधिक किमतीच्या औद्योगिक साहित्याचा अपहार केल्याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ६१२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२) अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी उमेश चंद्रकांत शिंदे (वय ४३, रा. ब्राम्हणवाडी, ता. वडगाव मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. तर अनिल पांडुरंग शिर्के (वय २७, व्यवसाय चालक, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १३ जुलै ते २० जुलै २०२६ या कालावधीत टाटा टोयो रेडिएटर लिमिटेड, कोरेगाव कंपनी येथे पोहोचविण्यासाठी आरोपीच्या ताब्यात पिकअप वाहन (एमएच-१४ एलव्ही-८६०३) मार्फत विविध औद्योगिक साहित्य देण्यात आले होते. मात्र आरोपीने कंपनीत माल जमा न करता तो स्वतःजवळ ठेवून आर्थिक फायद्याच्या उद्देशाने अपहार केल्याचा आरोप आहे.
अपहार करण्यात आलेल्या मालामध्ये फॅन मोटर बॉडी असेंब्ली टीवानोचे १० नग (किंमत ₹११,८६०) तसेच एक्स-१०४ डिझेल पॅल मोटर बॉडी असेंब्लीचे १६ नग (किंमत ₹३२,५७६) असा एकूण ₹४४,४३६ किमतीचा औद्योगिक माल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. कंपनीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने फसवणूक करून मालाचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस कर्मचारी मोरमारे करीत आहेत.