पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी…सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त व्यक्तीकडून ९ लाख रुपये उकळल्याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२) व ३१८(४) अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला. हा गुन्हा दि. २० जुलै २०२६ रोजी रात्री १०.१७ वाजता दाखल करण्यात आला.
याप्रकरणी मारुती मुकींदा शिकरे (वय ६५, सेवानिवृत्त), रा. कृष्णकली, जगताप इस्टेट, पिंपळे गुरव यांनी फिर्याद दिली आहे. तर संजय श्रीरंग सोनोने, रा. पातूर, जि. अकोला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ पासून आरोपीने फिर्यादी यांच्या जावयाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी फिर्यादींकडून टप्प्याटप्प्याने ९ लाख रुपये स्वीकारले. मात्र, नोकरी न लावता तसेच घेतलेली रक्कम परत न करता आरोपीने विश्वासघात करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.