Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला मुदतवाढ; ८ ऑगस्टपर्यंत बीएलओंच्या गृहभेटी
पिंपरी चिंचवड

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला मुदतवाढ; ८ ऑगस्टपर्यंत बीएलओंच्या गृहभेटी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पात्र मतदारांनी गणना प्रपत्र भरून सहकार्य करण्याचे आवाहन

पिंपरी, दि. २० जुलै २०२६ : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील अलीकडील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी केलेली मुदतवाढीची विनंती मान्य करत आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून घरभेटी घेऊन गणना प्रपत्र संकलित करण्याची मोहीम आता ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनेची प्रक्रिया देखील ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

यानंतर १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांना दावे व हरकती दाखल करता येतील. तसेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नोटिसा देणे, सुनावणी घेणे आणि दावे-हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पात्र मतदारांनी बीएलओ आपल्या घरी भेट दिल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र भरून द्यावे किंवा संबंधित मतदान केंद्रावर जाऊन ते सादर करावे. मतदार यादी अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “मतदार यादी ही लोकशाहीचा मूलभूत पाया आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला मिळालेली मुदतवाढ ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची संधी आहे. पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांनी बीएलओंना आवश्यक सहकार्य करून गणना प्रपत्र वेळेत भरावे आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपले योगदान द्यावे.

अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले की, “महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सुधारित वेळापत्रकानुसार प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. बीएलओंना नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेवर उपलब्ध करून दिल्यास पुनरीक्षणाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होईल. पात्र मतदारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता गणना प्रपत्र तातडीने भरून द्यावे.”

असे असेल सुधारित वेळापत्रक….

🔴३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ – बीएलओंच्या गृहभेटी व गणना प्रपत्र संकलन

🔴८ ऑगस्ट २०२६  – मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना पूर्ण

🔴१७ ऑगस्ट २०२६  – प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

🔴१७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ – दावे व हरकती स्वीकारणे

🔴१७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ – सुनावणी व दावे-हरकतींचा निपटारा

🔴१९ ऑक्टोबर २०२६ – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article१५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक प्रभागात ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प कार्यान्वित करा, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Next Article बँक ऑफ बडोदाच्या ११९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास महापौर रवि लांडगे यांची उपस्थिती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?