Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»वाल्हेकरवाडी परिसरात इलेक्ट्रिक दुचाकींना आग
पिंपरी चिंचवड

वाल्हेकरवाडी परिसरात इलेक्ट्रिक दुचाकींना आग

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे आग आटोक्यात, दोन महिलांचे वाचविले प्राण

पिंपरी, दि. २० जुलै २०२६: वाल्हेकरवाडी येथील दगडोबा चौक परिसरात सोमवारी सकाळी निवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तीन अग्निशमन वाहनांच्या सहाय्याने युद्धपातळीवर बचाव व अग्निशमन कार्य हाती घेतले.

प्राथमिक माहितीनुसार, चार्जिंगदरम्यान लागलेल्या आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केले. या आगीत तीन इलेक्ट्रिक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. त्यानंतर आगीने शेजारील दोन मजली इमारतीलाही वेढा दिला. आग लागल्यानंतर इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोन महिलांची अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडसाने व सुरक्षित सुटका केली. अग्निशमन दलाच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच आग परिसरातील इतर ठिकाणी पसरू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अग्निशमन दलाच्या वेगवान प्रतिसादामुळे आग अधिक वाढण्यापासून रोखण्यात यश आले.

याप्रसंगी उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली लीड फायरमन विनायक नाळे व शहाजी कोपनर तसेच फायरमन प्रल्हाद कोरडे, पंकज रसाळ, अमोल कुऱ्हाडे, इरफान बेलदार, एकनाथ ढगे, सखाराम चिमटे, भूषण येवले, तुषार बिरहाडे, सोहन तुकदेव, प्रकाश गव्हाणे, तेजस्वी पाटील, एकनाथ बुधवंत, सागर लावंडे, सागर गुरव, राहुल धुमाळ, महेश गरड, बालाजी सानप आदी कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आणि बचावकार्य यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

निवासी इमारतींमध्ये चार्जिंग करताना आवश्यक ती खबरदारी घेतल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज असून, या घटनेत जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे दोन महिलांचे प्राण वाचविण्यात यश आले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुणे गणेशोत्सवात झळकणार श्रीक्षेत्र खामुंडीच्या स्वयंभू काळभैरवनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती
Next Article १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक प्रभागात ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प कार्यान्वित करा, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?