पिंपरी,(थेरगाव)प्रतिनिधी : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त थेरगाव परिसरातील सन २०२६ मध्ये इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संतोष मंगल कार्यालय, संतोषनगर, थेरगाव, पुणे – ३३ येथे होणार आहे.
या समारंभासाठी थेरगाव परिसरातील सन २०२६ मध्ये १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत दि. २० जुलै २०२६ पर्यंत जय गणेश नागरी सहकारी पतसंस्था तसेच जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था, संतोषनगर, थेरगाव येथे जमा करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या गुणपत्रिकांचा विचार केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आयोजन जय गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, दैनंदिन प्रतिनिधी व कर्मचारीवर्ग यांनी केले असून, अधिक माहितीसाठी ९७६७५१२५३६, ९८९०९९९१७६ किंवा ९८६०६४४५६८ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी सौ. बारणे मायाताई संतोष आणि श्री. बारणे संतोष नागुभाऊ यांनी नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
