Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी २४ तासांत जेरबंद

October 3, 2026

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»डेंग्यू, मलेरियाविरुद्ध महापालिकेची व्यापक प्रतिबंध मोहीम
पिंपरी चिंचवड

डेंग्यू, मलेरियाविरुद्ध महापालिकेची व्यापक प्रतिबंध मोहीम

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्वच्छता, डास प्रतिबंधावर विशेष भर; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पिंपरी, : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरभर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छता, जनजागृती आणि डास नियंत्रणाच्या विविध मोहिमा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

पावसाळ्यात साचलेले पाणी, अस्वच्छ परिसर तसेच दूषित अन्न व पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करून वापरणे तसेच अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाण्याच्या टाक्या, कुलर, फुलदाण्या, टायर तसेच इतर पाणी साचणाऱ्या वस्तूंची नियमित स्वच्छता करावी. नागरिकांनी आठवड्यातून किमान एकदा अशा ठिकाणांची तपासणी करून पाणी साचू देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेकडून डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी अळीनाशक औषधांची फवारणी, डासांचा नायनाट करण्यासाठी धूर फवारणी (फॉगिंग), घराघरांत सर्वेक्षण, जनजागृती मोहीम तसेच आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक औषध फवारणी नियमितपणे केली जात आहे. याशिवाय महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये संशयित रुग्णांची तपासणी आणि आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 “पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांसोबतच नागरिकांचे सक्रिय सहकार्यही तितकेच आवश्यक आहे. ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा. प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून पाणी साचू न देण्याची काळजी घेतल्यास संसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल.”

…… रवी लांडगे,महापौर,पिंपरी चिंचवड 

“पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने प्रत्येक नागरिकाने स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपायांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. घर व परिसरात पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती रोखणे आणि ताप किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महापालिका प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवत असून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करून निरोगी, स्वच्छ पिंपरी चिंचवड घडविण्यास हातभार लावावा”

…….डॉ.विजय सुर्यवंशी.आयुक्त,पिंपरी चिंचवड मनपा.

डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करणे गरजेचे आहे. परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती रोखणे तसेच वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे हीच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरभर प्रतिबंधात्मक उपाय सातत्याने राबविण्यात येत असून नागरिकांच्या सहभागामुळेच निरोगी आणि स्वच्छ पिंपरी चिंचवडचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होईल असे उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यावेळी म्हणाले.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleएस.टी. महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त वल्लभनगर एस.टी. स्थानकात वृक्षारोपण; महापौर रवि लांडगे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Next Article निगडी अमरधाम स्मशानभूमी परिसरात कचरा टाकण्यास विरोध; प्रशासनाला तातडीने कारवाईची मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी २४ तासांत जेरबंद

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 3, 20260

निघोजे-तळवडे ब्रिज रोडवरील घटना; सीसीटीव्हीच्या तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध पिंपरी : रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला…

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?