Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना भक्कम आधार; दोषींवर कठोर कारवाईसह महापालिकेचे ठोस निर्णय
पिंपरी चिंचवड

मोशी दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना भक्कम आधार; दोषींवर कठोर कारवाईसह महापालिकेचे ठोस निर्णय

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि.१५ जुलै २०२६ :- मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सभेत दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार देण्यासह दुर्घटनेची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेमार्फत रुपये १० लाखांची आर्थिक मदत, तर जखमींना प्रत्येकी रुपये १ लाखांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठेकेदार मे. अँटोनी लारा यांच्यामार्फत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसाना ५० लाख मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार. तसेच मृतांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च करण्यात येणार असून, मृत व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना महानगरपालिका सेवेत नोकरी मिळण्याच्या दृष्टीने शासनाकडे आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

दुर्घटनेच्या अनुषंगाने मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना सेवेतून निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. दुर्घटनेची कारणे, तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तसेच अँटोनी लारा कंपनीचे प्रकल्प प्रमुख व सुरक्षा निरीक्षक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासोबतच, शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम व विकेंद्रीकृत करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका सभेत यापूर्वी झालेल्या निर्णयानुसार शहरातील सर्व प्रभागांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

“दुर्घटनेत जीव गमावलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक मदत देऊन आमची जबाबदारी संपणार नाही. त्यांच्या मुलांच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारत, पात्र वारसांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. त्याचवेळी या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. निष्पक्ष चौकशीतून जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,”

……. रवि लांडगे. महापौर,पिंपरी चिंचवड

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदौंड मधील पुरस्काराच्या मैदानात भोसरीच्या वस्तादाचा सन्मान
Next Article शहरात अत्याधुनिक, दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रिया केंद्रे उभारणार; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका सभेत दिली माहिती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?