Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पालखी सोहळ्यातील चोऱ्यांना आळा; गुन्हे शाखा युनिट-३ची धडाकेबाज कारवाई
पिंपरी चिंचवड

पालखी सोहळ्यातील चोऱ्यांना आळा; गुन्हे शाखा युनिट-३ची धडाकेबाज कारवाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
वारकरी महिलेचे दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन महिलांना रंगेहात पकडले; चोरीचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड, दि.१० जुलै : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने रंगेहात पकडत १ लाख ५० हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जप्त केले. पालखी सोहळ्यातील ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेचे उदाहरण ठरली आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीला प्रतिबंध करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे तसेच पोलीस अंमलदार सुरेखा बोरसे, बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, दिलीप राठोड, निखील फापाळे आणि स्वप्नील महाले यांचा समावेश होता. ही पथके आळंदी ते बोपखेल फाटा दरम्यान वारकऱ्यांसोबत साध्या वेशात तैनात होती.

पालखी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या एका महिला वारकरीच्या गळ्यातील मंगळसूत्र मागून आलेल्या दोन महिलांनी हिसकावले. मात्र, ही घटना पथकातील पोलीस अंमलदार दिलीप राठोड व स्वप्नील महाले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांना सतर्क केले. पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही महिलांना जागीच पकडले.

चौकशीत आरोपीचे नाव नयना विष्णू काळे (वय २०, रा. धारेगाव, मिटमिटा छावणी, संभाजीनगर) असे निष्पन्न झाले असून तिच्यासोबत एका विधीसंघर्षित अल्पवयीन मुलीचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले १३ ग्रॅम वजनाचे, १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले.

या प्रकरणी फिर्यादी सुनिता नारायणराव राऊत (वय ५०, रा. चोली फाटा) यांच्या तक्रारीवरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुदर्शन साईदास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Post Views: 40
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“मोशी कचरा डेपो तात्काळ बंद करा; पुनावळे डेपो सुरू करा” – माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी
Next Article मोशी कचरा डेपो दुर्घटना : दुर्घटनाग्रस्त इमारतीचा धोकादायक भाग हटविण्याचे काम वेगाने सुरू; जवानांच्या सुरक्षित प्रवेशासाठी इमारत स्थिर करणे गरजेचे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?