Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड मनपा यंत्रणा हायअलर्टवर
पिंपरी चिंचवड

मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड मनपा यंत्रणा हायअलर्टवर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

४२०० नागरिकांना सुरक्षित स्थलांतर, मदत केंद्रांमध्ये आयुक्तांकडून सोयी-सुविधांची पाहणी

पिंपरी चिंचवड दि.६ जुलै २०२६ : शहरात काल दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, सर्व अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानावर (फील्डवर) कार्यरत आहेत. शहरात आतापर्यंत ३२६ मिमी पावसाची नोंद झाली असून, काही सखल भागांतील रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सुमारे ४२०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने वेगवेगळ्या १७ ते १८ ठिकाणी तात्काळ बोटी तैनात केल्या आहेत.

पूरबाधित नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विविध मदत केंद्रांना महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

प्रशासनाने नागरिकांच्या निवासासाठी शहरात चोख व्यवस्था केली असून, पिंपरी नगर येथील कमला नेहरू शाळा येथे सर्वात मोठे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये मिलिंदनगर, विजयनगर आणि संजय गांधी नगर भागातील २५० कुटुंबे म्हणजेच १,०८० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षितपणे आश्रय देण्यात आला आहे.

येथे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जनरेटरद्वारे अखंडित प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, जेवणाची उत्तम व्यवस्था आणि स्वच्छ शौचालये उपलब्ध करून दिली आहेत.

यासोबतच फुगेवाडी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शाळा मदत केंद्रातही १८५ नागरिकांची अशीच उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, तिथल्या अधिकाऱ्यांना नागरिकांची पूर्ण काळजी घेण्याचे निर्देश आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत.

दरम्यान, हवामान खात्याने उद्यासाठी शहरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले कि, “नदीकाठच्या रहिवाशांनी सुरक्षिततेसाठी प्रशासनाला सहकार्य करून तात्काळ स्थलांतरित व्हावे, नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे आणि कोणतीही मदत हवी असल्यास महानगरपालिकेच्या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधावा,”असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मधील मुलांचे केले सुरक्षित स्थलांतर
Next Article मुसळधार पावसामुळे संभाजीनगर येथे टेम्पोवर झाड कोसळले; अग्निशामक विभागाची तात्काळ कारवाई
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?