पिंपरी, दि. ६ जुलै : पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. प्रभाग क्रमांक १० मधील संभाजीनगर परिसरात एका उभ्या असलेल्या टेम्पोवर अचानक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली.
या घटनेत टेम्पोचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक जवानांनी झाडाचे फांद्या व खोड कापून सुरक्षितरीत्या हटविले आणि काही वेळातच वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला. त्यांच्या तत्पर आणि दक्ष कामगिरीमुळे मोठी दुर्घटना टळली.
मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी मोठ्या झाडांखाली वाहन उभी करू नयेत तसेच अनावश्यक प्रवास टाळून सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
