Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मधील मुलांचे केले सुरक्षित स्थलांतर
पिंपरी चिंचवड

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मधील मुलांचे केले सुरक्षित स्थलांतर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवडमध्ये अतिवृष्टीचे संकट; अभिषेक बारणे यांनी वाचवले २०० हून अधिक जीव

पिंपरी-चिंचवड….पिंपरी-चिंचवड शहराला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसामुळे थेरगाव आणि चिंचवड परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. अशा कठीण परिस्थितीत, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून युद्धपातळीवर बचाव कार्य हाती घेतले आहे.

‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मधील मुलांची सुरक्षित सुटका

चिंचवडगाव परिसरातील भागात पाणी वेगाने वाढल्याने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ मधील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सभापती अभिषेक बारणे यांनी तातडीने धाव घेतली. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्याशी चर्चा करून आणि आपल्या यंत्रणेला सोबत घेऊन, त्यांनी गुरुकुलममधील सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. सभापतींच्या या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.

२०० हून अधिक गायींचे प्राण वाचवले

केवळ मानवी जीवच नव्हे, तर मुक्या जनावरांच्या सुरक्षेसाठीही त्यांनी मोठी कामगिरी बजावली. गुरुकुलमधील गोठ्यांमध्ये पाणी शिरल्याने २०० हून अधिक गायी अडकून पडल्या होत्या. अभिषेक बारणे यांनी स्वतः या बचाव कार्यात पुढाकार घेत या सर्व गायींना सुरक्षित स्थानी हलवले. त्यांच्या या धाडसी कार्याचे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनीही कौतुक केले असून, संकटकाळात प्रशासकीय प्रतिनिधीने दाखवलेली ही संवेदनशीलता दिलासादायक असल्याचे मत व्यक्त केले.

प्रशासन ‘हाय-अलर्ट’वर….

चिंचवड गाव आणि थेरगाव परिसरातील पावसाची स्थिती पाहता, सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना ‘हाय-अलर्ट’वर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सभापती अभिषेक बारणे यांनी प्रत्यक्ष परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले असून, “नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

अभिषेक बारणे यांच्या या कार्यतत्परतेमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात असून, संकटकाळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपूरबाधित भागातील १८८० व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
Next Article मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड मनपा यंत्रणा हायअलर्टवर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?