Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

मोशी दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा – यशवंतभाऊ भोसले

July 11, 2026

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पूरबाधित भागातील १८८० व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
पिंपरी चिंचवड

पूरबाधित भागातील १८८० व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये भोजन, आरोग्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत

पिंपरी, ०६ जुलै २०२६ : अतिवृष्टीमुळे पिंपरी चिंचवड शहरात पूरस्थिती उद्भवल्यानंतर आज दुपारी १२ वाजेपर्यंत विविध बाधित भागांतील १८८० व्यक्तींचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पूरबाधितांसाठी महापालिकेने विविध ठिकाणी निवारा केंद्रे तयार केली असून तेथे भोजन, आरोग्यासह आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेचा आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने कोणतीही जीवित अथवा वित्तीय हानी होऊ नये, यासाठी महापालिकेने नदीकाठच्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले आहे.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनीह शहरातील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेताना पावसाचा जोर वाढत असताना शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याची धोक्याची पातळी लक्षात घेऊन त्या भागातील नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे पूर्वसूचना देऊन पूरबाधितांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. कोणत्याही परिस्थितीत अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

पूर निवारा केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधेसह पथके नेमली आहेत. त्यांनी पूरबाधितांची आरोग्य तपासणी करून आवश्यक प्राथमिक उपचार करावेत. भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सोयीसुविधांची कमतरता राहणार नाही, याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती लक्षात आल्यास महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्ष क्रमांक ०२०-६७३३११११ / ०२०-२८३३११११ किंवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

विशेष लक्ष असणारे भाग….

पिंपरी चिंचवड शहरातील नदीपात्रापासून जवळ असणाऱ्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भाटनगर परिसर, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे निलख पंचशील नगर, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रामनगर, बोपखेल, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील संजय गांधी नगर, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे गुरव, लक्ष्मीनगर या भागांत पुराचे पाणी शिरण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भागांवर लक्ष केंद्रित केले आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय निवारा केंद्रांत असणाऱ्या पूरबाधितांची संख्या

(आकडेवारी ६ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंतची)

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय – ३०० नागरिक

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय – ६३० नागरिक

‘ड’ क्षेत्रीय कार्यालय – ९५० नागरिक

‘ह’ क्षेत्रीय कार्यालय – २१० नागरिक

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महापालिका युद्धपातळीवर कार्यरत – महापौर रवि लांडगे
Next Article स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मधील मुलांचे केले सुरक्षित स्थलांतर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

मोशी दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा – यशवंतभाऊ भोसले

July 11, 2026

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

मोशी दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा – यशवंतभाऊ भोसले

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी, दि. ११ जुलै : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी आणि…

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?