Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 3, 2026

आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यानिमित्त पीएमपीएमएलकडून जादा बससेवेचे नियोजन

July 3, 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांची पालखी मार्गाची पाहणी

July 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यानिमित्त पीएमपीएमएलकडून जादा बससेवेचे नियोजन
पुणे

आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यानिमित्त पीएमपीएमएलकडून जादा बससेवेचे नियोजन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे प्रतिनिधी…संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) यांनी विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. पुणे शहर, उपनगरे तसेच राज्यभरातून आळंदी आणि देहू येथे येणाऱ्या लाखो भाविकांसाठी नियमित बससेवेसह जादा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत.

५ जुलै ते ९ जुलै २०२६ या कालावधीत आळंदीसाठी स्वारगेट, महापालिका, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी आणि चिंचवड येथून दररोज एकूण १७९ बसेस धावणार आहेत. ८ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आळंदीसाठी विशेष बससेवा उपलब्ध राहणार आहे.

देहूसाठीही ५ ते ९ जुलैदरम्यान पुणे स्टेशन, महापालिका आणि निगडी येथून नियमित व जादा मिळून ३१ बसेस चालविण्यात येणार असून, देहू-आळंदी मार्गावर १५ विशेष बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

९ जुलै रोजी आळंदी येथून पालखी प्रस्थान असल्याने पहाटे २.३० वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर आणि महापालिका येथून आळंदीसाठी १८ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच सकाळी ५.३० वाजल्यापासून पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध स्थानकांवरून नियमित मार्गावरील १५० बसेस भोसरी व विश्रांतवाडीपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी धावणार आहेत. गरजेनुसार (किमान ४० प्रवासी असल्यास) अतिरिक्त बसेसही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

११ जुलै रोजी दोन्ही पालख्यांचे हडपसर येथे दर्शनासाठी दुपारी १२ ते १ या वेळेत थांबणार असल्याने महात्मा गांधी स्थानकातून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी आदी ठिकाणांसाठी विशेष बससेवा उपलब्ध राहील. तसेच कात्रज-कोंढवा मार्गासाठी शिवरकर गार्डन येथून, तर मुंढवा, चंदननगर आणि वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखी सोलापूर व सासवड मार्गे पुढे रवाना झाल्यानंतर वाहतुकीची परिस्थिती पाहून बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल. दरम्यान, हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने या मार्गावरील बससेवा बोपदेव घाट मार्गे चालविण्यात येणार आहे. यासाठी ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

पीएमपीएमएलने सर्व भाविक व प्रवाशांना या विशेष बससेवेचा लाभ घेण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांची पालखी मार्गाची पाहणी
Next Article पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पुण्यात डीपीला भीषण आग; फटाक्यांसारखे स्फोट, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

July 2, 2026

योग, ध्यान आणि सर्वांगीण आरोग्यासाठी आनंद मार्गचा मोफत योग परिसंवाद संपन्न

June 30, 2026

जमिनीच्या व्यवहाराच्या वादातून दगडाने हल्ला; एक गंभीर जखमी, आरोपी अटकेत

June 30, 2026

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलतर्फे विशेष सन्मान

June 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 3, 20260

दिनांक ३ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणी गरजा लक्षात घेऊन राबविण्यात येणारा ‘पवना…

आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यानिमित्त पीएमपीएमएलकडून जादा बससेवेचे नियोजन

July 3, 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांची पालखी मार्गाची पाहणी

July 3, 2026

सर्वधर्मीय १६०० विवाह जुळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरव

July 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?