इंदापूर प्रतिनिधी….इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची वटपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली.
वटपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीची गावातून भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या पालखी सोहळ्यास महादेव भजनी मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच गावातील स्वामीभक्त महिलांनी आपल्या घरासमोर तसेच चौकाचौकात आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले.
पालखी मंदिरात परतल्यानंतर ह.भ.प. रमेश महाराज कट्टे (वालचंदनगर) यांचे श्री स्वामी समर्थ चरित्रावर आधारित प्रवचन झाले. त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा नामजप व महाआरती संपन्न झाली.
या सोहळ्यात पालखीची आकर्षक सजावट श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी केली, तर मंदिरातील सुंदर रांगोळीची सेवा सौ. शितल सुनील टकले यांनी बजावली.
कार्यक्रमानंतर श्री महेश सुभाष माने यांच्या वतीने उपस्थित सर्व स्वामीभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास वालचंदनगर येथील स्वामीभक्त श्री राम कुंभार सर यांनी आवर्जून उपस्थिती लावली.
या धार्मिक व भक्तिमय सोहळ्यास निमसाखर व परिसरातील मोठ्या संख्येने स्वामीभक्त उपस्थित होते.
