Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध -डॉ.राजेश गवांदे
महाराष्ट्र

महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध -डॉ.राजेश गवांदे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 28, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आंतरराष्ट्रीय डिजिटल दंतचिकित्सा काँग्रेस २०२६ अंतर्गत उद्योग गोलमेज परिषद

मुंबई, दि.२८ जून : महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच देशांतर्गत उद्योगांच्या विकासालाही प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ.राजेश गवांदे यांनी केले. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे पार पडलेल्या ‘महाराष्ट्र : मौखिक आरोग्य सेवा परिसंस्थेसाठी अग्रगण्य गुंतवणूक केंद्र’ या विषयावरील गोलमेज परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेत देश-विदेशातील दंतवैद्यकीय उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या, तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. भारतीय दंतचिकित्सा संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनोज श्रीवास्तव, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे संयुक्त सचिव व धोरणात्मक सल्लागार डॉ. संतोष भोसले, भारतीय दंतचिकित्सा संघटनेचे मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे, मौखिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच उद्योग व व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

गोलमेज परिषदेत सहभागी मान्यवरांना संबोधताना डॉ. गवांदे म्हणाले, दंत उपचारांसाठी अधिक व्यापक विमा कव्हरेज उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशनने पुढाकार घेऊन खाजगी विमा कंपन्यांशी संवाद साधावा. दंत उपचारांना विमा संरक्षण मिळाल्यास नागरिकांचा उपचारांकडे कल वाढेल आणि उद्योगाला नवी बाजारपेठ निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले.

या क्षेत्रासाठी कौशल्यविकास आणि मनुष्यबळ निर्मितीचा विचार करता, महाराष्ट्र शासनाकडे स्वतंत्र कौशल्यविकास विभाग तसेच प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगाकडून आवश्यक कौशल्ये, प्रशिक्षणाची संरचना आणि उपकरणांची मागणी स्पष्ट झाल्यास तीन महिन्यांचे अल्पकालीन प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवून दंत उद्योगाला ‘इंडस्ट्री रेडी’ मनुष्यबळ उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’ आणि विविध प्रोत्साहन योजनांबाबत उद्योग प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचा उल्लेख करताना डॉ. गवांदे म्हणाले, ‘मैत्री’ पोर्टलमुळे परवानग्या, मंजुरी आणि सुलभ व्यवसायासाठीचा प्रशासकीय मार्ग मोठ्या प्रमाणात सुलभ होईल. दंत उद्योगाला स्वतंत्र उद्योग म्हणून प्रोत्साहनांच्या परिघात आणण्याचा मुद्दा मांडताना डॉ गवांदे म्हणाले, या संदर्भात आयडीएने उद्योग विभागाशी सविस्तर चर्चा करून एकत्रित प्रस्ताव तयार करावा. उत्पादन युनिट्स भारतात, विशेषतः महाराष्ट्रात सुरू करण्यास शासन इच्छुक असून, यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन पुढील रोडमॅप तयार करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. उद्योग, इंडियन डेंटल असोसिएशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या समन्वयातून मौखिक आरोग्य, दंत उत्पादन निर्मिती, संशोधन, कौशल्यविकास आणि वैद्यकीय पर्यटनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास डॉ गवांदे यांनी यावेळी व्यक्त केला.

तत्पूर्वी, महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव अविनाश सोलवट यांनी या परिषदेचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रभावशाली राज्य आणि जागतिक भांडवल तसेच नवोन्मेषाचे महत्त्वाचे केंद्र आहे. मौखिक आरोग्याच्या क्लिनिकल सेवा, शिक्षण, संशोधन, उत्पादन आणि डेंटल टुरिझम यांचा समावेश असलेला सर्वसमावेशक ‘ओरल हेल्थकेअर इकोसिस्टम’ उभारण्याचा संकल्प त्यांनी यावेळी मांडला. इंडियन डेंटल असोसिएशनचे मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीत हेलिऑन – सेन्सोडाईन, कोलगेट-पामोलिव्ह, युनिकॉर्न डेनमार्ट लिमिटेड, ड्यूर डेंटल इंडिया प्रा. लि., डेंट्सप्लाय सिरोना इंडिया प्रा. लि., शोफू डेंटल इंडिया प्रा. लि., डेंटल प्रॉडक्ट्स ऑफ इंडिया (डीपीआय), मेकओ – टूथसी, क्रोमाडेंट डेंटल इक्विपमेंट्स, प्रॉमिस डेंटल सिस्टिम, आदी मेड प्रायव्हेट लिमिटेड, पिडिलाइट विझडेंट, प्रिव्हेस्ट डेनप्रो लिमिटेड, सेलाडेंट आदी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थित उद्योजक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या संस्थेची माहिती दिली. महाराष्ट्रात गुंतवणूक आणि व्यवसाय वृद्धीसाठी शासनाच्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक करून येथे गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंवादाचा विश्वासार्ह चेहरा : जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक
Next Article महाराष्ट्रात दंत आरोग्य व दंत पर्यटन क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्याची क्षमता
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘एक अटल भारत’ नाटकाद्वारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

August 10, 2026

एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार ….मंत्री प्रकाश आबिटकर

August 8, 2026

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी ….केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

August 8, 2026

‘दादा’ : शिक्षणातून राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणारा महामानव – डॉ.भरत चव्हाण पाटील

August 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?