Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे वेधले सरकारचे लक्ष
महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे वेधले सरकारचे लक्ष

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भामा-आसखेड जलवाहिनीचे काम ९ ते १० महिन्यांत पूर्ण होणार, तब्बल ८४ कोटींच्या नव्या २ निविदा जाहीर ; सरकारचे लेखी आश्वासन

पिंपरी-चिंचवड,दिं..२३ जून  : भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला १६७ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळवून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी जलवाहिनी प्रकल्पाच्या विलंबाबाबत भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी चालू विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. शहराचा पाण्याचा प्रश्न तातडीने सुटावा आणि प्रकल्पात चालढकल करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आमदार गोरखे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या वादग्रस्त ठेकेदाराला हटवून आता दोन नव्या निविदा काढून युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

आमदार अमित गोरखे यांनी अधिवेशनात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. पिंपरी-चिंचवडकरांना हक्काचे पाणी मिळवून देणारा भामा-आसखेड प्रकल्प वेळेत का पूर्ण झाला नाही? तसेच काम रखडवणाऱ्या आणि काळ्या यादीत नाव असलेल्या ठेकेदारालाच पुन्हा काम दिले गेले आहे काय? असा थेट सवाल आमदार अमित गोरखे यांनी विचारला होता. यावर उपमुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत ‘काळ्या यादीतील ठेकेदाराला पुन्हा काम दिलेले नाही’ असे स्पष्ट केले. तसेच, प्रकल्पाचा विलंब टाळण्यासाठी आणि काम तातडीने पूर्ण करण्यासाठी जुन्या कंत्राटदारावरील कारवाईनंतर आता नवीन पारदर्शक पद्धतीने दोन वेगवेगळ्या निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची अधिकृत माहिती शासनाने दिली.

शासनाने जाहीर केलेली नवी रुपरेषा

प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने तब्बल ८४ कोटींच्या दोन नवीन निविदा काढल्या आहेत. यामध्ये नवलाख उंब्रे ब्रेकप्रेशर टाकी ते तळवडे देहू दरम्यान १४०० मि.मी. व्यासाची गुरुत्वनलिका टाकण्याच्या उर्वरित कामासाठी ५० कोटी ६८ लाख ९२ हजार ३६४ रुपयांची निविदा काढण्यात आली असून हे काम पूर्ण करण्यासाठी १० महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात, भामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्र ते नवलाख उंब्रे ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत १७०० मि.मी. व्यासाची रायझिंग मेन टाकण्याच्या कामासाठी ३३ कोटी ३४ लाख ४३ हजार ९२० रुपयांची निविदा काढण्यात आली असून हे काम ९ महिन्यांच्या मुदतीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

“पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असून नागरिकांना मुबलक पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. भामा-आसखेड प्रकल्पाच्या कामात झालेला विलंब अजिबात खपवून घेतला जाणार नाही. यापूर्वी ज्यांनी कामात हलगर्जीपणा केला, त्यांच्यावर कारवाईची मागणी मी लावून धरली होती. आता शासनाने नवीन कंत्राटदारांमार्फत ९ ते १० महिन्यांची कडक मुदत देऊन काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाने दिलेल्या या मुदतीत काम पूर्ण करून घेण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या घराघरात पाणी पोहोचेपर्यंत माझा हा पाठपुरावा अविरत सुरूच राहील”

           – आमदार अमित गोरखे

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleइंडो अथलेटिक्स सोसायटीची १० वी पुणे–पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न
Next Article शहराच्या जलसुरक्षेसाठी पाणी बचत आवश्यक; नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?