Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»शाश्वत भविष्यासाठी ‘हरित शपथ’ अभियान
पिंपरी चिंचवड

शाश्वत भविष्यासाठी ‘हरित शपथ’ अभियान

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
वैयक्तिक व सामूहिक हरित उपक्रमांना मिळणार गुणांकन

पिंपरी, दि.१३ जून २०२६ : वसुंधरेचे संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत ‘हरित शपथ’ या ई-प्रतिज्ञा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांनी पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून वसुंधरा संवर्धनासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

उपक्रमांतर्गत नागरिकांना माझी वसुंधरेच्या  https://majhivasundhara.in/en/pledge/MQ%3D%3D या संकेतस्थळावर जाऊन वैयक्तिक अथवा सामूहिक स्वरूपात हरित शपथ घेता येणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या या ई-प्रतिज्ञा आणि त्यानुसार राबविण्यात आलेल्या कृतींच्या आधारे सहभागी व्यक्ती व गटांचे गुणांकन करण्यात येणार आहे.

वृक्षसंवर्धन, जलस्रोतांचे जतन, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत आणि स्वच्छता यांसारख्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून भावी पिढ्यांसाठी सुरक्षित व समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी नमूद केले.

हरित शपथ ही केवळ प्रतिज्ञा नसून वसुंधरा संवर्धनासाठीची सामूहिक बांधिलकी आहे. या उपक्रमात सहभागी होऊन अधिकाधिक नागरिकांनी वसुंधरा रक्षणाच्या चळवळीत योगदान द्यावे, असे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी सांगितले.

“वसुंधरा संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक बांधिलकी आहे. ‘हरित शपथ’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजविण्याचा आणि शाश्वत विकासाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन वृक्षसंवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन आणि ऊर्जा बचत यांसारख्या हरित कृतींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, हरित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीतून शपथ घ्यावी”

 

-रवि लांडगे, महापौर,पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकेंद्र शासनाच्या आयटीआय ग्रेडिंगमध्ये महापालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची देशात ७ वी तर राज्यात ५ व्या क्रमांकाची उल्लेखनीय कामगिरी
Next Article आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांची नाले व नदीपात्राची पाहणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?