अहिल्यानगर राहुरी प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील ता. राहुरी येथील सडे येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना राहुरी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली आहे.
याबाबत फिर्यादी सुनील साईनाथ बर्डे (रा. सडे, ता. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) व इतर संबंधित कलमानुसार दि.०८ जून २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यातील आरोपी सुनील गंगाधर पवार, लक्ष्मण भाऊसाहेब माळी आणि सागर सुभाष बर्डे (सर्व रा. सडे, ता. राहुरी) यांना पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींना दि.०८ जून २०२६ रोजी माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दि.१५ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक विजय देशमुख व ठेंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल सय्यद, पोलीस हवालदार दारकुंडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, कुऱ्हाडे आणि भाऊसाहेब शिरसाठ यांनी सहभाग घेतला.
