Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»अवकाळी पावसाचा कहर!
महाराष्ट्र

अवकाळी पावसाचा कहर!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
अंजनवतीतील दोन सख्ख्या भावांची घरे जमीनदोस्त; मुलगी जखमी, लाखोंचे नुकसान

बीड प्रतिनिधी, दि. ९ जून : खरीप हंगामाच्या तोंडावरच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. मंगळवारी सायंकाळी चारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अंजनवती गावातील दोन सख्ख्या शेतकरी भावांची घरे पूर्णपणे कोसळून जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत एका मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठी जीवितहानी मात्र थोडक्यात टळली.

गावातील पंजाब स्वामी येडे आणि पंढरी स्वामी येडे या शेतकरी भावांची घरे पावसाच्या तडाख्यात कोसळली. घर कोसळत असताना कुटुंबीय घरातच असल्याने एकच गोंधळ उडाला. अचानक भिंती व छप्पर कोसळल्याने कुटुंबीय जीव वाचवण्यासाठी बाहेर धावले. या दुर्घटनेत एका मुलीच्या डोक्याला मार लागून ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घरामध्ये साठवून ठेवलेले सुमारे १५ कट्टे तूर, ५ ते ६ क्विंटल ज्वारी आणि ९ ते १० क्विंटल गहू मातीखाली दबले गेले. तसेच पलंग, भांडी, दरवाजे, फॅन, टेलिव्हिजन, कूलर, फ्रीजर, विद्युत साहित्य आणि इतर संसारोपयोगी वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे.

घर कोसळल्यामुळे दोन्ही शेतकरी कुटुंबे अक्षरशः उघड्यावर आली आहेत. वर्षभराच्या कष्टाने उभा केलेला संसार काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या या शेतकरी कुटुंबांसाठी हे संकट अधिकच गंभीर ठरले आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करावा, जखमी मुलीला वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी आणि दोन्ही शेतकरी कुटुंबांना त्वरित आर्थिक सहाय्य जाहीर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

“घर गेले, धान्य गेले, संसार उघड्यावर आला” अशी हळहळ व्यक्त करत ग्रामस्थांनी शासनाकडे मदतीची आर्त मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष मदत किती वेगाने पोहोचते, याची कसोटी आता अंजनवतीतील या दुर्घटनेत लागणार आहे.

अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असून या दोन्ही कुटुंबांना शासनाकडून तातडीची मदत मिळणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान
Next Article हृदयद्रावक! वीज पडून बैल दगावल्याने आर्थिक चणचण; लातूरमध्ये शेतकऱ्याच्या पत्नीवर स्वतः नांगराला जुंपण्याची वेळ
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?