कागल (कोल्हापूर), दि. ९ जून २०२६ : कागल तालुक्यातील निढोरी रोड, भडगाव पाटी येथील माऊली हॉलमध्ये शासकीय मान्यताप्राप्त पैलवान सुभाषदादा पाटील युथ फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, युवा उद्योजकता, पत्रकारिता, आरोग्य सेवा, कला, क्रीडा, साहित्य, कृषी, पर्यावरण, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये भोसरी गावचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठेचा ‘राजा शिवछत्रपती पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि मानाचा फेटा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात देशभरातील सुमारे १५० मान्यवरांना युथ फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण प्रमुख पाहुणे रंगराव पाटील (ब्रँच पोस्टमास्टर), भास्कर शेटे (युवानेते, हातकणंगले विधानसभा), पैलवान अभिजित तापेकर (प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), बंडा लोंढे (शहराध्यक्ष, शिवसेना, कोल्हापूर) तसेच स्मिताराणी गुरव (माजी सभापती, पंचायत समिती व जिल्हा महिला उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संजय गायकवाड (अध्यक्ष, हर्षल फाऊंडेशन, देवळा), हर्ष सृष्टी (संचालक, ऑल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज), विजय पवार (युवा उद्योजक, धुळे जिल्हा), विकास खतकर (युवा उद्योजक, हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी) तसेच उत्तमभाऊ जाधव (तालुका अध्यक्ष, स्पार्टन बॉईज, भुदरगड) यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांगोरे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन अभिजित माने सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पैलवान सुभाषदादा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
