ईश्वरपूर, दि. ९ जून २०२६ : नेरले गावातील प्रणव (अवधूत) धनाजी पाटील आणि विराज सुरेश पाटील या दोन युवकांना ईश्वरपूर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणतेही गुन्हेगारी कारण नसताना बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याशी चर्चा केली.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संबंधित घटनेबाबत माहिती घेतली. यावेळी युवकांवर झालेल्या कथित मारहाणीबाबत पोलीस प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागण्यात आले. मात्र, या संदर्भात पोलीस निरीक्षकांकडून कोणतेही ठोस कारण सांगण्यात आले नसल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, कायदे सल्लागार संतोष कदम, सांगली जिल्हा निरीक्षक मोहन (नाना) पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष सुभाष पाटील, मोहन धनवडे, मिलिंद आढाव, सुहास पाटील, दिलीप खोत आणि गोरख पल्ले उपस्थित होते.
