Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»२ कोटी १७ लाख रुपये किमतीच्या औषध व वैद्यकीय साहित्य साठ्यावर कारवाई
महाराष्ट्र

२ कोटी १७ लाख रुपये किमतीच्या औषध व वैद्यकीय साहित्य साठ्यावर कारवाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 7, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
वैद्यकीय उपकरणे नियम २०१७ अंतर्गत मुंबई, ठाणे व पालघर येथे एफडीए चे छापे

मुंबई, दि. ०६ जून : भिवंडी, पालघर आणि मुंबई येथील तीन आस्थापनांमधून एकूण ८१ लक्ष किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला असून १ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा सर्जिकल ग्लोव्हज साठा गुणवत्ता चाचणीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार तपासणी मोहीम कारवाईत औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियमांचा भंग करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA)तपास पथकाने मे.साची मेडिक, साकीनाका या आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात परवाने व नोंदणी नसलेल्या व्यावसायिकाने मलेशिया (Malaysia) येथून विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हजची आयात करून कोणत्याही परवान्याशिवाय साठवणूक व विक्री केल्याचे उघड झाले. आयात केलेले ग्लोव्हजची वाडा व भिवंडी येथील वैद्यकीय उपकरणे उत्पादन परवाने असलेल्या व्यावसायास पँकिग व लेबलीग करून पुढे त्याची विक्री करण्यास पुरवठा केला असल्याचे आढळून आले. या कारवाईत ७४.८५ रुपये किमतीचे ‘विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हज’ (Non-Sterile Surgical Gloves) जप्त करण्यात आले. कागदपत्रांनुसार या पेढीने मुंबई महानगरपालिका रुग्णालयांना पुरवठा/ विक्री केल्याचे आढळून आले आहे.

मे.साची मेडिक या संस्थेच्या भिवंडीतील वैद्यकीय उपकरण उत्पादक आस्थापनावर कारवाई करण्यात आली. तथापि तपासणीदरम्यान तेथे ‘वैद्यकीय उपकरणे नियम २०१७’ च्या तरतुदींचा गंभीर भंग झाल्याचे आढळून आले. जनस्वास्थाच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने ९.८८ लक्ष रुपयांचा ग्लोव्हजचा साठा प्रतिबंधित केला असून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

पालघर जिल्ह्यातील वाडा येथील मेडिअर्थ लाईफकेअर आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात उघडकीस आला, तिथे निर्जंतुकीकरण (Sterilization) व इतर उपकरणे नादुरुस्त आहेत, अशा स्थितीत ‘विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हज’ (Non-Sterile Surgical Gloves) खरेदी करून त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते निर्जंतुक असल्याचे भासवून शासकिय रुग्णालयांना वैद्यकीय महाविद्यालयांना पुरवठा करण्यात आल्याची माहिती आस्थापना मालकाने दिली आहे. या मोहिमेत कोट्यावधीचे विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हज (Surgical Gloves) वर निर्जंतुक लेबल करून शासकीय वैद्यकीय रुग्णालयांना महाविद्यालयांना देखील पुरवठा करण्यात आल्याचा गैरप्रकार गंभीर आहे. प्रशासनाने १.२६ कोटी किमतीचा विना निर्जंतुकीकरण बँडेज, रोल बँडेज व कॉटन गौज साठा विक्री व वितरणासाठी प्रतिबंधित केला आहे. तसेच वैध परवाना नसताना बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला अॅलोपॅथिक औषधांचा ६.१७ लक्ष किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून, हस्तगत केलेल्या अभिलेख्याची पडताळणी सुरु आहे.

वैद्यकीय व्यावसायिक व रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासनचे आवाहन

सर्व डॉक्टर, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय व्यावसायिकांना आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी औषधे, सर्जिकल ग्लोव्हज (Surgical Gloves) किंवा अन्य कोणतीही वैद्यकीय उपकरणे खरेदी करताना ती केवळ परवानाधारक आणि अधिकृत उत्पादक/पुरवठादाराकडूनच खरेदी करावीत, असे आवाहन केले आहे. सदर उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात होत असतो त्यामुळे पुरवठा करण्यात आलेल्या खात्रीशीर गुणवत्ता नसलेल्या उत्पादनांच्या वापरामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होतो. वैद्यकीय उपकरणे किंवा औषधे खरेदी करताना त्यावर परवाना क्रमांक (License Number), बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट व्यवस्थित छापलेली आहे की नाही याची खात्री करावी. शस्त्रक्रिया किंवा तपासणीसाठी वापरले जाणारे ग्लोव्हज Medical Devices Rules २०१७ च्या मानकाप्रमाणे आहेत की नाही हे तपासावे. पॅकिंग फाटलेले असल्यास ते वापरणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअपघातातील मृतदेह शिक्रापूर हद्दीत टाकून फरार झालेला आरोपी ४८ तासांत जेरबंद
Next Article नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?